गणेशोत्सवाला अवघे 3 दिवस उरले आहेत. येत्या 7 सप्टेंबरला घराघरात गणपतींचे (Ganpati Festival) आगमन होणार आहेत. या आगमनापुर्वीचे सोनं स्वस्त (Gold Rate) झालं आहे.
सोन्याचे दर काहीसे खाली आले आहेत. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा दर हा 71 हजार 494 होता. हाच दर बुधवारी 71 हजार 280 पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे किंचित का होईना सोन्याचा दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
भारतीय सराफा बाजारात आज 4 सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत घट दिसून आली आहे. सोन्याचा भाव 71 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव 81 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या म्हणजेच 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 71280 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 81038 रुपये प्रति किलो आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवारी 3 सप्टेंबरला संध्याकाळी, 24 कॅरेट सोन्याचा दर 71 हजार 494 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज, 04 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 71 हजार 280 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे सोन्याचा दर 214 रूपयांनी स्वस्त झाला आहे.
