पारनेर ब्रेकिंग! शेततळ्यात बुडून सून-सासर्‍याचा मृत्यू

पारनेर – तालुक्यातील हिवरे कोरडा (Hivare Korada) येथील हिंगणदरा वस्तीवर शेततळ्यात पाणी काढण्यासाठी गेलेल्या सूनेचा व तिला वाचविण्यासाठी गेलेल्या सासर्‍याचा बुडून मृत्यू (Drowning Death) झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.

मुरलीधर मारूती नवले (वय 70) व उज्वला आबा नवले (वय 40, दोघे रा. हिवरे कोरडा) असे मयतांची नावे आहेत. मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या सूनेचा (Daughter in Law) पाय घसरून त्या शेततळ्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी सासर्‍याने तात्काळ धाव घेतली मात्र त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचाही बुडून मृत्यू (Drowning Death) झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक महिती अशी की, उज्वला नवले या आपल्या शेत तळ्यात पाणी पाणी (Water) काढण्यासाठी गेल्या होत्या. पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरून त्या तळ्यात पडल्या. याची माहिती त्यांचे सासरे मुरलीधर यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ तळ्याकडे धाव घेतली. मात्र सासरे वयोवृध्द असल्यामुळे सूनेचा प्राण वाचवण्यासाठी ते अपयशी ठरले व त्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Leave a Comment