वार फिरल.. भाजपला मोठा धक्का, ‘या’ राज्यात काँग्रेसच सरकार?

नवी दिल्ली : देशाचे लक्ष लागलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडलेले असून एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सलग तीन दिवस मुक्काम ठोकून काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अशा प्रमुख नेत्यांनी भाजप उमेदवारांना जिंकविण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकांत भाजपची झालेली पिछेहाट आणि इंडिया आघाडीच्या वाढलेल्या जागांच्या पार्श्वभूमीवर सलग तिसऱ्यांदा सत्ता राखण्यात भाजपला अपयश येईल, असा अनेकांचा अंदाज आहे. तर जाट, मुस्लीम आणि दलित मतांच्या पाठिंब्यावर काँग्रेस सत्तेत येईल, असे बोलले जाते. इंडिया आघाडीतील आम आदमी पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांच्याही मतांच्या टक्केवारीवर अनेक समीकरणे अवलंबून असतील.

Haryana Exit Poll Result: रिपब्लिकच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचा विजय होणार असल्याचा अंदाज

आम आदमी पक्ष- 00 जागा

भाजप- 18-24 जागा

काँग्रेस- 55-62 जागा

इंडियन नॅशनल लोकदल आणि बसप युती 3-6 जागा मिळण्याचा अंदाज

हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबरला (शनिवारी) एकाच टप्प्यात मतदान संपन्न झाले. पाठोपाठ चार दिवसांमध्ये ८ ऑक्टोबरला हरियाणाचा निकाल येणार आहे. याच दिवशी जम्मू काश्मीर विधानसभेचाही निकाल लागणार आहे.

Leave a Comment