मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी मंत्र्यांवर कोसळला दु:खाचा डोंगर, यांचं निधन 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची माहिती ताजी असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. काही दिवसांआधी समीर खान यांच्या गाडीचा अपघात झाला होता. ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे.

कुर्ला पश्चिम भागात समीर खान यांच्या थार कारला एसयूव्हीने मागून येऊन धडक दिली होती. या अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Leave a Comment