हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाबद्दलचा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवस पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईसह 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बीड, धाराशीव, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
तर दुसरीकडे सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, सांगली, नंदुरबार, नाशिक,धुळे या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच विदर्भातील अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम , बुलडाणा या जिल्ह्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
