संगमनेर – “विरोधक म्हणतात सगळी पदे घरातच ठेवली. बाळासाहेब थोरात यांचा परिवार म्हणजे संगमनेर तालुका. संगमनेर तालुक्याकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही. हा तालुका तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जेव्हापसून हे खोके सरकार बनलं तेंव्हापासून त्रास चालू केला. बाळासाहेब थोरात यांनी त्यांचं ( विखेंच ) काय वाईट केलं होतं? बाळासाहेब थोरात सर्वात जास्त काळ महसूलमंत्री राहिले, पण कधी कुणाचं वाटोळं केलं नाही, कुणाला त्रास दिला नाही. तुम्ही ज्यांच्यावर टिका करता ते बाळासाहेब थोरात या संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहेत. खबरदार, माझ्या बापाविषयी असे काही बोलले तर..” असा सज्जड दम जयश्री थोरात यांनी दिला.
तसेच “तुम्ही ज्यांच्यावर टिका करता ते बाळासाहेब थोरात या संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान आहेत. खबरदार, माझ्या बापाविषयी असे काही बोलले तर. ज्यांना स्वतःच घर सांभाळता येत नाही, ते आपलं घर काय सांभाळणार. आपल्या तालुक्यातील काही टवाळके त्यांच्यासोबत फिरतायत. तुम्ही कुणाला घरात घेताय ते एकदा बघा. बाळासाहेब थोरात यांना पूर्ण देशात मान आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीत मनमोहन सिंग, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासोबत बाळासाहेब थोरात यांचे नाव आहे. ही निवडणूक एकतर्फी करायची आहे. विरोधकांचे डीपॉजिट जप्त झाले पाहिजे..” असा घणाघातही त्यांनी केला.
“जे आपलं वाटोळं करायचं बघत आहेत, त्यांना संगमनेर तालुक्यात एन्ट्री द्यायची नाही. बाळासाहेब थोरात यांची 1985 सालची निवडणूक युवकांनी हाती घेतली होती. आज देखील जे युवक माझ्यासोबत आहेत ते माझे भाऊ आहेत. माझ्या भावांना त्रास द्यायचा नाही. हे बाळासाहेब थोरात यांची सुपुत्री आणि भाऊसाहेब थोरात यांची नात बोलतीये. आपल्याकडे फक्त 30 दिवस, साहेबांची कॉलर टाईट होईल असे काम करायचे आहे…” असे आवाहनही जयश्री थोरात यांनी केले
