मोठी बातमी! नगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील, अमोल खताळ, संग्राम जगताप मंत्रिमंडळात…..

मुंबई (DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. एकट्या भाजपला 132 जागा मिळाल्या आहेत तर महायुतीला तब्बल 233 जागा मिळाल्या आहेत. अशावेळी आता महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळणार यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.

दरम्यान, नेमक्या कोणत्या नावांची चर्चा सुरू आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

महाराष्ट्रात नेमके किती मंत्री होऊ शकतात?

विधानसभेचं संख्याबळ 288 आहे, त्यापैकी 15 टक्के मंत्रिपदाची संख्या आहे. म्हणजे महाराष्ट्रात 43 मंत्री होऊ शकतात. ज्यापैकी 33 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री राहू शकतात.

 

मंत्रिपदासाठी महायुतीचा काय फॉर्म्युला?

6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असा महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला असू शकतो. भाजपचे 132 आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या साधारण 24 मंत्र्यांसह सत्तेत सर्वात मोठा असेल.

यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचा नंबर लागेल. कारण त्यांचे 57 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना 12 मंत्रिपदं मिळू शकतील. तर त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदं मिळू शकतात. कारण त्यांचे 41 आमदार निवडून आले आहेत.

दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात किती मंत्रिपदे मिळणार याचीच उत्सुकता लागली आहे. मात्र भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांची पुन्हा कॅबिनेट मंत्रिमंडळात वर्णी लागणार हे फायनल झाले आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच संगमनेरमधून कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अमोल खताळ यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. अशी चर्चा सुरू आहे.

Leave a Comment