मोठी बातमी! नाना पटोले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातल्या पराभवाचा सर्व खापर नाना पटोले यांच्यावर फोडले जात आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर नाना पटोले यांनी राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. राज्यातील पराभव स्वीकारून नाना पटोले राजीनामा देणार आहेत. आज वरिष्ठांशी बोलून राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज नाना पटोलो दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी अनेक चांगली कामे केली होती. त्यानंतर त्यांच्यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांना घवघवीत यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर विधानसभेत त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

विधानसभेत काँग्रेसला अपयश मिळाल्यामुळे अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. नाना पटोले यांच्यावर दबाव होता. त्यामुळे ते राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी पक्षश्रेष्ठींना भेटून ते राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment