मेष : मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल, म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्यापूर्वी विचार करा.
वृषभ : पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा, तिच्या यशाने आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा. घरातील वातावरण आनंदी राहील.
मिथुन : काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. कुटुंबीयांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या.
कर्क : स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धक्काधक्कीचे, धावपळीचे बनेल. आपल्या वेळेची किंमत समजा. मनावर संयम बाळगा.
सिंह : वैयक्तिक प्रश्न मानसिक आनंद हिरावून घेतील. परंतु, आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल. तणावाशी सामना करू शकाल.
कन्या : कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकता. दिवसा झालेल्या वाद-विवादानंतर तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.
तूळ : कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे त्रासून जाल. परंतु, राग अनावर होऊ नका; अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल.
वृश्चिक : आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल.
धनु : मनासारख्या घटना घडतील. बाहेरगावी गेलेला तुमचा जोडीदार परत येईल, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. मनावरील ताण कमी होईल.
मकर : आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दुसर्यांच्या शब्दावर विसंबून गुंतवणूक केलीत, तर आर्थिक तोटा होण्याची शक्यता.
कुंभ : कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. धन तुमच्या हातात टिकणार नाही. धन संचय करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मीन : कार्य क्षेत्रात तुमच्या जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. आर्थिक प्रगती होईल. पैशांची आवक झाल्याने खरेदीचा मूड होईल
