मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
धनू : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.
कुंभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
मीन : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.
