मेष : आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल.
वृषभ : पत्नी तुम्हाला आनंदी करील. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल.
मिथुन : आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. आर्थिक आवक चांगली राहील.
कर्क : कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे संतुलन ढळू देऊ नका; अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल.
सिंह : तुमच्या मनात नवीन चिंता असेल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. मनावर ताबा ठेवा.
कन्या : कामे संपविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेम जिंकाल. कामातील बदल तुम्हाला मन:शांती मिळवून देईल.
तुळ : कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक द़ृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका.
वृश्चिक : क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या.
धनु : आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. विनाकारण कोणताही ताण घेऊ नका.
मकर : कुटुंबातील समस्या सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावाल. मित्रमंडळींशी भेट झाल्याने आनंदाने मन उचंबळून येईल.
कुंभ : तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. खरेदीचा मूड बनेल.
मीन : आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. घराच्या द़ृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या.
