मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
वृषभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रूंवर मात कराल.
मिथुन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
तूळ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. उत्साह व उमेद वाढेल.
वृश्चिक : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
धनू : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
मकर : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
