पारनेर (DSNews24/किरण पुरी) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नुकतीच पारनेर तालुक्याची कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये पारनेर तालुका (उबाठा) शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुख पदी नांदूर पठारचे शाखाप्रमुख नितीनशेठ आहेर यांची निवड करण्यात आली आहे. आहेर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
सत्कारावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे उपतालुकाध्यक्ष रविंद्रशेठ राजदेव, मा.सरपंच भानुदास आग्रे, रंगनाथ राजदेव, नांदूर पठार निलेश लंके प्रतिष्ठान चे अध्यक्ष रमेश पाटील घोलप, संदेश आग्रे, रामदास राजदेव, मारुती आग्रे, मंगेश अहिले, रविंद्र घोलप, अमोल गाडगे, प्रणव पानसरे, साई घोलप, भाऊसाहेब चौधरी, माधव आग्रे, संजय डेरे, नारायण चौधरी, नारायण आग्रे माजी शाखाप्रमुख संतोष आग्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नितीन आहेर यांना भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या.
