पारनेर (DSNews24/किरण पुरी) ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…चला पाहू रे सोहळा पंढरीचा.. महाराष्ट्रातून लाखो वारकरी, भक्त विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झाले आहे. एकादशी वारकऱ्यांसाठी सण असतो. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूर मध्ये पोहचले आहेत. तसेच राज्यभरात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे. तसेच प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अनेक पायी दिंड्या जात आहे.
रस्त्यावरून पायी जाणाऱ्या दिंडीतील भाविकांसाठी ठिकठिकाणी फराळाची सोय करण्यात आली आहे. तसेच आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारनेर तालुक्यातील काळभैरवनाथ नांदूर पठार ते गुप्त विठोबा मंदिर बांगरवाडी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पायी दिंडी रस्त्याने जात असताना निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी दिंडीतील वारकऱ्यांसाठी फराळाची सोय केली होती. दिंडीतील प्रत्येक वारकऱ्याला फराळाचे वाटप रविंद्र राजदेव यांनी केले. त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. तसेच रविंद्र राजदेव यांना या उत्कृष्ट कार्यासाठी काही वारकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी वारकऱ्यांच्या रूपात रविंद्र राजदेव यांना विठुरायाचे दर्शन घडून आले.
यावेळी फराळ वाटप करण्यासाठी मा.सरपंच भानुदास आग्रे, रविंद्र घोलप, संदेश आग्रे, रामदास राजदेव, शैलेश राजदेव, आर्यन विश्वासराव, साई घोलप, बंटी घोलप, अक्षय राजदेव, रमेश पाटील घोलप, बाबाजी चौधरी, नारायण आग्रे, शशिकांत आग्रे, मयुर राजदेव आदी निलेश लंके प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते.
