शेतकऱ्यांसाठी पारनेर तहसीलसमोर भूमिपुत्रांचा ठिय्या आंदोलन 

पारनेर(DSNews24/किरण पुरी) विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तसेच दिव्यांगांचे मानधन वाढविणार, असे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र आज सत्तेत असताना देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी, त्यांचा सातबारा अजूनही कोरा झालेला नाही. यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला संपूर्ण राज्यात जोरदार प्रतिसाद मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात देखील आंदोलन करण्यात आलं.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेने या चक्काजाम आंदोलनाला या आधीच जाहीर पाठिंबा दिला होता. त्याच अनुषंगाने भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा विविध घोषणांनी तहसील परिसर अक्षरशः दणाणून गेला होता. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दिपक कारखिले यांना देण्यात आले.

यावेळी संतोष वाबळे, सुभाष पाटील करंजुले, राजेंद्र करंदीकर, अविनाश देशमुख, प्रवीण खोडदे, सुरेश गोळे, नंदन भोर, मजाबापू वाडेकर, तेजस भोर, गोरख पठारे, राहुल गुंड, नारायण रोकडे, पांडुरंग पडवळ, वसंत साठे, विशाल करंजुले, अनिल सोबले, अरुण बेलकर, जय गायकवाड, रागूनाथ मांडगे, सतीश बागल, गणेश दळवी, बाळासाहेब वाळुंज, रामदास बालवे, बबन गुंड, संभाजी वाळूज यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment