राज्यातील पुढील दिवस ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा 

हवामान विभागानं राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीय. पुढील ५ दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. हवामान विभागाने आज पालघर, रायगड,भंडारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलाय.

तर कोकण आणि विदर्भातील वर्धा तसेच नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विदर्भातील इतर जिल्हे, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

Leave a Comment