साकूर गाव गुलामांचा न होता अधिकाऱ्यांचा व्हावा – जयवंत आवटे 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) विद्या प्रबोधिनी संस्थेत येताना आनंद झाला. या विद्यालयातील माजी विद्यार्थी देशाचे संरक्षण करतात हे खास वैशिष्ट्य आहे. तसेच विद्या प्रबोधिनी ही संस्था समृद्ध आहे. कारण विद्यार्थ्यांसाठी बस नसलेले महाराष्ट्रातील एकमेव विद्या प्रबोधिनी विद्यालय आहे. तसेच साकूर गाव गुलामांचा न होता अधिकाऱ्यांचा व्हावा असे प्रतिपादन लेखक, व्याख्याते व कथा कथनकार जयवंत आवटे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील विद्या प्रबोधिनी शैक्षणिक संकुलातील मातोश्री बदामबाई फिरोदिया प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि प.पु कनकमलजी ( बाबुशेठ) फिरोदिया उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर हे होते. तर व्यासपीठावर थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठुराज मैड, माजी पंचायत समिती सदस्य अशोक हजारे, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिरा शेटे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनंदा भागवत, थोरात कारखान्याचे संचालक रामदास धुळगंड सर, युवा नेते बाळासाहेब सागर, नामदेव खेमनर, सरपंच सचिन सोनवणे, सुदाम सागर, रजिस्टार हेमचंद्र होळकर, प्राचार्या गुलशन जमादार, मुख्याध्यापक सुभाष घुगरकर, उद्योजक आदिकराव खेमनर, दिपक फिरोदिया, अल्लीभाई मोमीन, दिनकर भगत, लहानु खेमनर, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब सागर, लक्ष्मण कुदनर, उत्तम कुदनर, कोंडाजी कुदनर, निसार पटेल, किसन खेमनर, महादू कुदनर, दादाभाऊ खेमनर, संतोष खेमनर, संतोष ढेंबरे, प्रकाश शेलार आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी लेखक, व्याख्याते व कथा कथनकार जयवंत आवटे यांच वाजतगाजत विद्यार्थ्यांनींनी लेझीम नृत्यावर कार्यक्रमस्थळापर्यंत स्वागत केले. त्यानंतर या स्नेह संमेलनचा प्रारंभ विद्यार्थ्यांनींच्या स्वागतगिताने झाला. तसेच मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करत स्व. अशोकराव पा. खेमनर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.‌ त्यानंतर पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी परिस या शालेय हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.

त्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल व दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर म्हणाले की, विद्या प्रबोधिनी संस्था राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत भाग घेत असते. तसेच वर्षभर शिक्षकांनी घेतलेल्या कष्टांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन कार्यक्रम घेतले जातात. त्याचबरोबर शिक्षणाबरोबरच विविध उपक्रम राबविले जातात. २००० साली विद्या प्रबोधिनी विद्यालयाची खडतर प्रवासातून सुरूवात झाली. त्यासाठी पालकांचा मोठा सहभाग आहे. कमी खर्चात विद्यार्थ्यांसाठी शिक्षण गेले पाहिजे अशी संकल्पना स्व. अशोकराव खेमनर यांची होती. या विद्यालयातून असंख्य विद्यार्थी उच्च पातळीवर विविध क्षेत्रातील सेवेत आहेत. काळ बदलत चालला आहे मात्र विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही संस्था प्रयत्न करत आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे क्लास तसेच विद्यार्थ्यांनीसाठीही विविध क्लासेस विद्यालयात सुरू आहे. खेड्यात पालकांची मानसिकता विकसित नसते पण चर्चा करून ती बदलावी लागते. तसेच एखादी संस्था चालवताना मार्गदर्शन घ्यावे लागते असे इंद्रजित खेमनर म्हणाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर म्हणाले की, २००० साली स्व.अशोक पा. खेमनर यांनी विद्या प्रबोधिनी प्रशालेची स्थापना केली. शिक्षकांच्या सहकार्याने हे विद्यालय चालू आहे. रमेश फिरोदिया यांनी या विद्यालयाला भरभरून मदत केली.

स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक प्राचार्या गुलशन जमादार यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. प्रविण मिसाळ व आभार रजिस्टार हेमचंद्र होळकर यांनी मानले. यावेळी विद्या प्रबोधिनी प्रशालेतील सर्व संचालक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment