महाराष्ट्र हादरला! काँग्रेसच्या बड्या नेत्याची हत्या

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचं उपचारादरम्यान निधन झाले. मंगळवारी दुपारी हिदायत पटेल यांच्यावर राजकीय वादातून जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. हिदायत पटेल 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. हिदायत पटेल सध्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते.

मंगळवारी रात्री उशिरा हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करणाऱ्या उबेद पटेल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. उबेद पटेल हा 24 मे 2019 मध्ये हत्या करण्यात आलेल्या मोहाळा गावातील भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांचा पुतण्या आहे. 2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती.

या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 आरोपी होतेय. काल दुपारच्या दोन वाजताच्या नमाजनंतर हिदायत पटेल मोहाळा गावातील मरकज मशिदीत नमाज पडून बाहेर येत असताना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला होता. पटेल यांच्या मानेवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करण्यात आले होते.

कोण आहेत हिदायत पटेल ?

हिदायत पटेल हे सध्या प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा म्हणून हिदायत पटेल यांना ओळखलं जात होते. अकोला जिल्हा काँग्रेसचे आठ वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. पटेल 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार होते. पटेल 2014 मध्ये दुसऱ्या स्थानावर. तर 2019 मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिले होते. हिदायत पटेल जिल्ह्यातील मोठे सहकार नेते. 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक राहिले. सध्या अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष होते. 35 वर्षांपासून जिल्ह्यातील महत्वाच्या अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक राहिलेत.

Leave a Comment