अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय….

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरूवारी बारामतीमध्ये शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार करणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजितदादांच्या निधनानंतर पुण राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी या निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करणार नाहीत. मतदारांना फक्त पत्रके वाटून प्रचार करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत. उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असं आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. निवडून आल्यांनतर देखील कुठलीही मिरवणूक काढली जाणार नाही.

Leave a Comment