अहिल्यानगर – महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर आहेत. काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, १८, १९ मार्च रोजी अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी शेतातील काढणीस आलेला गहू, हरभरा आणि ज्वारीची पिके वाचविण्याच्या कामाला लागला आहे.
राज्यात उन्हाच्या कहिलीपासून नागरिकांना थोडाचा दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यात विषेशतः मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.
पुढील दिवसांचा हवामान अंदाज
१७ मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट :
सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.
१८ मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट :
रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा, सांगली, हिंगोली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.
१९ मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट :
रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा, सांगली, सोलापूर कोल्हापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ.
