जांबुत खुर्द येथे गणपीर बाबांच्या यात्रोत्सवात रंगणार क्रिकेटचा थरार

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांबुत खुर्द येथील गणपीर बाबा यात्रेनिमित्त भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेच आयोजन मुंबई येथील एकता कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेच उद्घाटन वार – बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सरपंच सोनाली शेटे यांच्या हस्ते होणार आहे.

जांबुत खुर्द येथे गणबीर बाबांचं जागृत ठिकाण आहे. दरवर्षी गणपीर बाबांचा यात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यात्रेनिमित्त एकता कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने विविध विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेच आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी देखील २५ व २६ मार्च रोजी क्रिकेट स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेत अनेक संघ सहभागी होणार आहेत.

तसेच या क्रिकेट स्पर्धेसाठी एकता कमिटी मुंबई यांच प्रथम क्रमांकासाठी २० हजार रुपये, सरपंच सोनाली शेटे व उपसरपंच सुभाष डोंगरे यांच द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये, राजू शेठ डोंगरे यांचं तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व आरीफ हामीद पठाण व आरीफ रहिम पटेल यांचं चतुर्थ क्रमांकासाठी ५ हजार रुपयांच बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच कै. दत्तात्रय भाऊसाहेब पारधी व म. निजाम रमजान पठाण यांच्या स्मरणार्थ सर्व बक्षिसांसाठी ट्रॉफी देण्यात येणार आहे.

तसेच या स्पर्धेची एकता कमिटीच्या वतीने जय्यत तयारी सुरू केली आहे. खास मैदान देखील बनविण्याच काम चालू आहे. या स्पर्धेचा क्रिकेट रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एकता कमिटी मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment