साकूरचे माजी सरपंच रामभाऊ लक्ष्मण पवार यांचं निधन

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर गावचे माजी सरपंच रामभाऊ लक्ष्मण पवार यांचे मंगळवार, दि. १४ जुलै रोजी पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साकूर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रामभाऊ पवार यांनी १९८० ते १९८५ तसेच १९८५ ते १९८७ या कालावधीत सलग दोन वेळा साकूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले. त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. विकासाभिमुख दृष्टीकोन, लोकाभिमुख कारभार आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांनी ग्रामस्थांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.

सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे साकूर गावाने एक ज्येष्ठ, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Comment