IND Vs Aus : कांगारूंना जिंकण्यासाठी 76 धावांची गरज, टीम इंडियाची हाराकिरी

IND Vs Aus :- इंदूर कसोटीच्या दुस-या दिवशी भारतीय संघाने आपल्या दुस-या डावात ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपुढे पुन्हा एकदा शरणागती पत्करली. कांगारूंच्या पहिल्या डावातील 88 धावांच्या आघाडी मोडून काढता-काढता रोहित सेनेची अक्षरश: भांबेरी उडाली. नॅथन लायनचे 8 बळी, तर स्टार्क आणि कुहमेनच्या 1-1 विकेटच्या जोरावर स्मिथच्या संघाने टीम इंडियाचा 163 धावांवर ऑलआऊट केला.

भारतीय संघाने कशीबशी 75 धावांची आघाडी मिळवली आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून चेतेश्वर पुजाराने (59) एकमेव अर्धशतक झळकावले.

शुक्रवारी सामन्याच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाज हे लक्ष्य गाठतील का? की, भारतीय फिरकी कांगारूंना रोखून ऐतिहासिक विजयाची नोंद करेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Comment