तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची ताकद महाराष्ट्रात सातत्याने वाढत आहे.
याआधी राज्यातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. आता भाजपाच्या २ माजी आमदारांनी BRS चा झेंडा हाती घेतला आहे.
महाराष्ट्रातील नागपूरात बीआरएस पक्षाचे पहिले कार्यालयाचे उघडण्यात आले आहे. लवकरच राज्यभरात ठिकठिकाणी बीआरएस पक्षाचे कार्यालय होईल असं पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
भाजपाचे राजू तोडसाम, चरण वाघमारे या विदर्भातील २ आमदारांनी के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे.
