आमदार निलेश लंके(Nilesh Lanke) यांना राजकारणात खूप शिकण्याची गरज आहे. ते बालिश हरकती करीत राहतात. ते पहिल्यांदा निवडून आले आहेत. मला वाटतं त्यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा दिसत नाही.
त्यांनी बेताल वक्तव्य थांबविली पाहिजेत, अशी टीका महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.१५) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या जोडीदारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वारकऱ्यांवरील झालेल्या लाठीहल्ल्यात पारनेरमधील एक वारकरी जखमी झालेले आहेत.
त्यांच्यावर उपचार सुरु असून, लंके यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.
याबाबत विखे यांना पत्रकारांनी विचारले असता, लंके यांना पुन्हा निवडून येण्याची इच्छा दिसत नाही, असे वक्तव्य विखे यांनी केले.
