मान्सून संदर्भात खुशखबर, पुढील ४८ तासांत…

हवामान विभागाने पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. या आठवड्या अखेरीस, म्हणजेच पुढील 48 तासांत मान्सूनच्या सरी मुंबईसह महाराष्ट्रात बरसू शकतात.

अरबी समुद्रात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मान्सून सक्रिय होण्याची ही चिन्हे आहेत. परिणामी मान्सून येत्या 48 तासांत मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा, विदर्भात 23 जूननंतर पावसाला सुरु होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे येत्या रविवारपासून सर्वत्र चांगला पाऊस सुरु होईल, असं भाकीत हवामान खात्याने केले आहे.

पावसाचं पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल, मात्र पावसाचे पूर्वानुमान पाहून पेरणीचे नियोजन करावं, असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येतं आहे. मान्सूनने दांडी मारली आहे.

Leave a Comment