केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक फॉर्म्युला दिला आहे. त्यानुसार, देशात पेट्रोल केवळ 15 रुपये प्रति लिटर दराने विक्री होईल, असा दावा केला आहे.
बुधवारी राजस्थानमधील प्रतापगडमध्ये नितीन गडकरी यांनी पेट्रोल स्वस्ताईविषयी वक्तव्य केले. वाहनांमध्ये 60% इथेनॉल आणि 40% विजेचा वापर झाल्यास देशात पेट्रोलचा वापर कमी होईल.
पेट्रोल केवळ 15 रुपये लिटर दराने मिळेल असा दावा त्यांनी केला. यामुळे देशात पेट्रोलचा वापरच कमी होणार नाही तर प्रदुषणही कमी होईल, असे मत त्यांनी मांडले.
