अहमदनगर : देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की एकनाथ शिंदे सोबत आल्यावर फायदा होईल. आता ते म्हणातात की अजित पवार सोबत आल्यामुळे फायदा होणार आहे. परत दोन महिन्यांनी म्हणतील आपला साराच बेस निघून गेला.
भाजप एवढा मोठा पक्ष होता, तर अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी भाजप युतीबरोबर गेलो होतो, गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. मात्र आताचे नेते हे गोपीनाथ मुंडे यांच्या पेक्षा हुशार आहेत, असा खोचक टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लगावला आहे.
तसेच त्यांना आता आमची गरज नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे लागणे यात काही अर्थ नाही असंही जानकर म्हणाले.
