राष्ट्रवादी काँग्रसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांनी संख्याबळाच्या जोरावर पक्ष आणि चिन्ह घड्याळावर दावा ठोकाला आहे. सत्तेत सहभागी होताच अजितदादांचे भाजपच्या दिल्ली वर्तुळात वजन वाढल्याचे दिसून येत आहे.
यातूनच केंद्र सरकारकडून पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केली आहे. मात्र आपण भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेत कुठलीही तडजोड करणार नसल्याचेही पवारांनी स्पष्ट करत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार, खासदार अजित पवारांकडे गेले तरी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे. या कार्यकर्त्यांच्या बळावर आपण पुन्हा सर्व काही मिळवू असा विश्वासही पवारांना आहे.
अधिवेशनानिमित्त पवार सध्या दिल्लीत आहे. पुण्यातील कार्यकर्त्यांनी पवारांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.
