Ahmednagar : नगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा ; प्रशासनाने दिले ‘हे’ आदेश

Ahmednagar : रविवार पाठोपाठ सोमवारीही ढगांचा गडगडाट, विजांच्या लखलखाटात नगर जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.

कांद्याचे भाव कोसळलेले असतानाच, अवकाळी पावसाच्या तडाख्याने गहू आणि हरभरा पिक धोक्यात आले आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे.

दरम्यान, राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment