WWE : डब्लूडब्लूई स्टार ब्रे वॅटचे(Bray Wyatt) गुरुवारी (२४ ऑगस्ट २०२३) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ३६ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. डब्लूडब्लूईचा अधिकारी पॉल आणि माजी रेसलर ट्रिपल एचने सोशल मीडियाद्वारे ब्रे वॅटच्या मृत्युची घोषणा केली.
ब्रे वॅटच्या रुपात डब्लूडब्लूईने एक स्टार गमावला आहे. ब्रे वॅट मृत्युची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
“डब्लूडब्लूई स्टार विंडहॅम रोटुंडा म्हणजेच ब्रे वॅटने वयाच्या ३६व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या कुटुंबियातील सदस्य माईक रोटुंडाकडून ही दुःखद बातमी कळाली. ब्रे वॅटच्या मृत्युने माझ्यासाठी मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाबरोबर आहेत”, असे ट्वीट ट्रिपल एचने केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रे वॅट आरोग्याच्या अज्ञात समस्येने ग्रस्त होता. तो गेल्या अनेक महिन्यांपासून डब्लूडब्लूईमध्ये सक्रीय नव्हता. त्याने २००९ मध्ये डब्लूडब्लूईच्या रिंगणात पाऊल ठेवले. मात्र, २०२१ आणि २०२२ मध्ये तो डब्लूडब्लूईचा भाग नव्हता. त्याला एक वर्षासाठी सोडण्यात आले, जो सर्वांसाठी मोठा धक्का बसला. यानंतर गेल्या वर्षी ब्रे वॅटने थाटात डब्लूडब्लूईमध्ये पुनरागमन केले. मात्र, गुरुवारी त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ब्रे वायट दोन वेळा डब्लूडब्लूई युनिव्हर्सल आणि एक वेळा डब्लूडब्लूई चॅम्पियनशिपचे किताब जिंकले. मॅट हार्डीसह त्याने डब्लूडब्लूई रॉ टॅग टीम चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. तर, २०१९ मध्ये वायटची डब्लूडब्लूई मेल रेसलर ऑफ द ईयर म्हणून निवड झाली.
