संगमनेर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळवाडी शिव- रात म्हाळुंगी नदीच्या बायपास पुलावर भरधाव वेगातील पिकअपने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. पती व मुलगा गंभीर जखमी झाले.
संगमनेर शहरालगत गुंजाळवाडी शिवारातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील म्हाळुंगी नदीच्या पुलाच्या बोगद्यातून वैष्णवी ऊर्फ रोहिणी खराडकर, पती चंद्रकांत आणि मुलगा शुभम हे तिघे दुचाकीवरून घरी निघाले असता मोटारसायकलला भरघाव वेगाने आलेल्या पिकअपने पाठीमागून जोराची धडक दिली.
झालेल्या या भीषण अपघातात वैष्णवी खराडकर ही महिला जागीच ठार झाली. तिचा पती चंद्रकांत व मुलगा शुभम हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर नाशिक येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
याबाबत मृत वैष्णवीचा भाऊ अश्विन कुमार दीपक बेल्हेकर (रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पिकअप चालक सतीश संदीप डोंगरे (रा. पांगरी त्यांच्या माथा, ता. जुन्नर, जि. पुणे) याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
