तर 25 आमदार राजीनामा देणार, अजितदादा गटातील आमदाराची मोठी घोषणा…….

नाशिक : अजितदादा गटातील आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मोठी भूमिका घेतली आहे.

मला वर बसून मुद्दे मांडता येत नाही, म्हणून मी यांना मुद्दे मांडायला देतो. आता आपल्याला डोक्याने लढायचं आहे असेही ते म्हणालेत. आदिवासी बांधवांचा उलगुलान मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

त्यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मार्गदर्शन करताना मोठी घोषण केली. आदिवासीतून कुणाला आऱक्षण देता कामा नये. आम्हाला ४७ जाती म्हणून आरक्षण मिळाले. पण, ४८ वी जात आरक्षणात घेतली जाऊ नये.

आपल्याला रडायचं नाही, तर लढायचं आहे. आम्ही सर्व आदिवासी आमदार मंगळवारी पक्षप्रमुखांकडे राजीनामा देणार आहोत. आम्ही 25 जणांनी मनावर घेतलं तर कुठलचं सरकार राहणार नाही. सगळे आमदार राजीनामा देतील, असा इशारा नरहरी झिरवाळ यांनी दिला.

Leave a Comment