संगमनेर : बिरेवाडी येथील भाऊसाहेब सागर यांचं निधन 

संगमनेर(DSNews24) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब पांडुरंग सागर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल आहे. त्यांचं मृत्यूसमयी ७७ वय होत. वार – गुरूवार दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बिरेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणून भाऊसाहेब सागर यांची ओळख होती. त्यांनी गावपातळीवर विविध क्षेत्रात अग्रेसर कार्यात सहभाग घेतला आहे. तसेच धार्मिक कार्यात त्यांचं मोलाच योगदान देखील लाभलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी नबाबाई तसेच एकनाथ सागर, सुभाष सागर, रविंद्र सागर असे तीन मुले असा परिवार आहे.

भाऊसाहेब सागर यांच्यावर सायंकाळी ४ वाजता बिरेवाडी गावठाण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान त्यांच्या निधनाने बिरेवाडीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment