भाजपच्या या नेत्यान उद्धव ठाकरे यांना दिल चॅलेंज,म्हणाले…

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी मात्र किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांनी दिलेल्या शिव्या सांगत पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर किरीट सोमय्या म्हणाले त्यांची पीडा समजून घेतली पाहिजे.

संजय राऊत यांनी केलेळी शिवीगाळ त्यांची संस्कृती दाखवते. तशी संस्कृती आमची नाही. आणि उद्धव ठाकरे मला तोतऱ्या म्हणतात. पण या तोतऱ्याने तुमच्या बायकोचे एकोणीस बंगले कुठे गायब केले ते द्या. या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे.

मी उद्धव ठाकरे यांना खुलं चॅलेंज करतोय, ज्या शिव्या द्यायच्या आहे त्या द्या पण एकोणीस बंगले कुठे गायब केले ते सांगा ना? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment