कुठल्यातरी माकडाने छगन भुजबळ यांना…..मनोज जरांगेंची सडकून टीका

सांगली : गोदावरी खोरे संपन्न असल्याने त्या भागात लोक विस्थापित होऊन राहायला येतात. मीही आलोय. मी सासऱ्याची भाकरी तोडतोय, अशी माझ्याबद्दल कुठल्यातरी माकडाने चुकीची माहिती छगन भुजबळ यांना दिलीय.

पण लोकांचे खाल्ल्यानेच भुजबळ जेलमध्ये जाऊन आले. त्यांना मराठ्यांचे आरक्षण खुपायला लागले आहे. समाजात दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा पलटवार मनोज जरांगे-पाटील यांनी येथे झालेल्या विराट सभेनंतर पत्रकारांशी बोलताना केला.

अंबड येथील ओबीसी एल्गार सभेत भुजबळांनी केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ”मराठा ओबीसीत आला आहे, हे भुजबळांचा कळून चुकलंय. आता आम्ही चिडावे, यासाठी ते काहीपण बोलत आहेत. मी काय शिकलो, हे त्यांना काय करायचे? लोकांचे खाल्ल्याने ते जेलमध्ये जाऊन आले. तुम्ही लोकांचे पैसे खाता, रक्त पिता. आता भुजबळांचे वय झाले आहे, त्यामुळे ते बडबडत आहेत.

मराठ्यांची एकजूट त्यांना खपत नाही. आम्ही उत्तर द्यायला सक्षम आहोत, मात्र तुम्हाला उत्तर द्यायचे नाही. कारण तुम्ही किती खालच्या पातळीवरचे आहात, हे लोकांना कळून चुकले आहे. भुजबळ कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत.

आम्ही तुमच्या शेपटावर पाय दिला नाही, तुम्ही आमच्या पायावर पाय देऊ नका. ओबीसी आरक्षणात येऊ नये म्हणून हा खटाटोप सुरू आहे. ओबीसी व मराठ्यांत वितुष्ट येणार नाही, वाद होणार नाही.”

Leave a Comment