बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका उच्च शिक्षित तरुणीने आत्महत्या (Solapur Bride Suicide) करून जीवन संपविले. हळदीच्या दिवशीच हा प्रकार समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. हळदीचा कार्यक्रम पार पडल त्यानंतर सर्व कुटुंबीय झोपायला गेले. पहाटे 5 च्या सुमारास सालिया हिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतं आपले जीवन संपवले.
लग्नाच्या बोहुल्यावर चढण्यापूर्वी उच्च शिक्षित तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडलाय. सालिया शेख असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गावातील काही तरुण सालिया हिचे लग्न होऊ नये यासाठी त्रास देत होते. तसेच होणाऱ्या नवरदेवास आणि मुलीच्या वडिलांना देखील फोन करून धमक्या देत होते. गावातील समीर शेख, सलमान शेख, वसीम शेख ह्या तरुणांच्या त्रासाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केलाय.
सालिया शेख हिचा विवाह 18 डिसेंबर रोजी विजयपूर येथील तरुणाशी होणार होता. त्यासाठी कुटुंबाने संपूर्ण तयारी देखील केली होती. काल रात्री घराजवळ हळदीचा कार्यक्रम देखील पार पडला. त्यानंतर सर्व कुटुंबीय झोपायला गेले. त्यानंतर पहाटे 5 च्या सुमारास सालिया हिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतं आपले जीवन संपवले.
समीर शेख आणि सलमान शेख या तरुणांच्या विरोधात सालिया शेख हिने स्वतः पोलिसात तक्रारी अर्ज देखील दिला होता. समीर आणि सलमान हे लग्न केल्यास होणाऱ्या नवऱ्यास जीवे मारण्याची धमकी देत होते. तसेच समीर सोबत माझे संबंध असल्याचे सांगून बदनामी करत असल्याचा उल्लेख पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सालिया हिने केला आहे. दरम्यान पोलिसांनी संबंधीत तरुणांना तात्काळ अटक करत कारवाई करावी अशी मागणी मृत मुलीचे वडीलांनी केलीय.
सालियाचा सोमवारी (18 डिसेंबर) विवाह होता. त्यामुळे शेख कुटुंबात रविवारी (17 डिसेंबर) हळदी समारंभ धुमधडाक्यात पार पडला. सालियाचा आत्महत्येची बातमी समोर आली अन् आनंदाचा सोहळा दु:खात बुडाला. उच्च शिक्षित असलेल्या सालियाने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.
