नगरमधील ‘या’ गावात एकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या 

अहमदनगर – ४१ वर्षीय इसमाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर गावात घडली.

विठ्ठल आनंदा गारूडकर (वय ४१. रा. अकोळनेर, ता. नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विठ्ठल गारूडकर यांनी रविवारी (दि. १४) झाडाला गळफास घेतला. याची माहिती नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी विठ्ठल यांना उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषीत केले.

याबाबतची माहिती डॉ.कुलकर्णी यांनी रूग्णालयात नेमणूकीस असलेले तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जठार यांना दिली. अंमलदार जठार यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार एस.एन.माने करीत आहेत.

Leave a Comment