अंबरनाथ : बदलापुरातील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना अंबरनाथमधून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अंबरनाथमध्ये ३५ वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीला शौचालयात नेऊन विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.
अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथमध्येही एका ९ वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ३५ वर्षीय तरुणाने एका ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ शहरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्याचवेळी तरुणाने तिला गाठलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफित दाखवून विनयभंग केला.
दरम्यान, मुलीच्या आईने २१ ऑगस्ट रोजी अंबरनाथ पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.
