उद्योगपती अनंत अंबानी साईबाबांच्या चरणी, केले “एवढ्या” कोटींच दान

शिर्डी – लायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी हे देशातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन पूजा करताना दिसतात. ते देवाचा आशिर्वाद घेतात. नुकतच अनंत अंबानी हे शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी दर्शनासाठी गेले होते. त्यांनी दर्शन घेतल्यानंतर साईचरणी पाच कोटींची देणगी दिली आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला होता.

ख्रिसमस उत्सव आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनंत अंबानी यांनी साईंच्या दरबारी जाऊन पूजा-अर्चना केली. त्यांनी निळी चादर अर्पण केली आणि सायंकाळच्या आरतीतही सहभाग घेतला. साईबाबा ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितले की, अनंत अंबानी यांच्याशी वेगवेगळ्या धर्मादाय उपक्रमांबद्दलही चर्चा झाली. उद्योगपती अनंत अंबानी यांनी मंदिरात येऊन आरती केली. त्यांनी मंदिराला पाच कोटी रुपये दान केले.

Leave a Comment