मेष : कुटुंबातील इतर सदस्यांची मदत घ्या. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल.
वृषभ : मित्रांकडून मदत मिळवा. स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल.
मिथुन : मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज. पवित्र आणि खर्या प्रेमाचा अनुभव येईल.
कर्क : नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस सुखद आणि अनोखा असेल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता.
सिंह : आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. तुम्ही एखादे अवघड काम पूर्ण केल्यामुळे सर्व मित्र तुमची स्तुती करतील.
कन्या : व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल.
तुळ : कार्यालयीन काम फत्ते होईल. कारण, सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही शंभर टक्के सहकार्य मिळेल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या.
वृश्चिक : आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल.
धनु : आराम करायला हवा; अन्यथा थकव्यामुळे निराशावादी द़ृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. दुसर्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका.
मकर : तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले, तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमँटिक आनंद देईल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल.
कुंभ : तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे. परंतु, कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. प्रलंबित देणी आल्यामुळे सांपत्तिक स्थिती सुधारेल.
मीन : व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल. रिकाम्या वेळात काही रचनात्मक कार्य करू शकता.
