मोठी बातमी! LPG गॅस सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त

व्यावसायीक सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी कपात करण्यात आली आहे. LPG गॅस सिलिंडरची विक्री करणार्‍या पेट्रोलियम कंपन्यांद्वारे LPG दर (LPG नवीनतम दर) करण्यात आले.

१ जूनपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तब्बल १७२ रुपयांची ही घट असून यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

मात्र, असे असले तरी, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत आज व्यावसायिक सिलिंडर ८३.५ रुपयांनी स्वस्त झाला असून १७७३ रुपयांना तो उपलब्ध आहे.

1 मे रोजी दिल्लीत घरगुती SPG सिलिंडरची किंमत ११० रुपये होती आणि आजही त्याच दराने उपलब्ध आहे. दरम्यान, १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता दिल्लीत १ हजार ७७३ रुपयांच्या स्वस्त दरात विकला जात आहे.

कोलकात्यात आज पासून व्यावसायिक सिलेंडर १८७५.५०, मुंबईत १७२५ आणि चेन्नईत १९३७ या रक्कमेत सिलेंडर विकला जाणार आहे. व्यावसायिक सिलिंडरमध्ये ८३.५० रुपयांची घट झाल्याने आणखी एक दिलासा मिळाला आहे.

कोलकातामध्ये सिलेंडर ८५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. या ठिकाणी आता १९६०.५० रुपयांवरून १८७५.५० रुपयांना सिलेंडर मिळणार आहे. मुंबईत सिलेंडरचे दर हे १८०८.८ रुपयांवरून १७२५ रुपयांवर आले आहेत.

तब्बल ८३.५० रुपयांनी व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला आहे. तर चेन्नईमध्ये ते २०२१.५० रुपयांवरून १९३७ रुपयांपर्यंत खाली आले आहे. या ठिकाणी तब्बल ८५.५० रुपयांची घट झाली आहे.

Leave a Comment