आमच्याकडे विधानसभेतील राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 43, तर विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
येत्या 6 ऑक्टोबरपासून निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीला अजित पवार व शरद पवार गटांच्या नेत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दावा केला की, नोव्हेंबर 2023 पर्यंत देशातील सात राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला मिळेल.
