मेष : कोणालाही जामीन राहू नका. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मिथुन : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
सिंह : व्यवसायातील आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. वादविवाद टाळावेत.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
तूळ : आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
धनू : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर : गुरुकृपा लाभेल. व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
कुंभ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
