पारनेरच्या डॉ. नारायण म. जाधव यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा – तुकाराम पुरस्कार जाहीर 

मुंबई (DSNews24/किरण पुरी) संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन २०२३ या वर्षासाठी वैराग्यमूर्ती, त्यागमूर्ती, ज्ञानमूर्ती, वेदशास्त्र, पुराण, संत साहित्याचे गाढे अभ्यासक असलेले अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील कर्जुले हरेश्र्वर येथील ह.भ.प डॉ. नारायण महाराज जाधव यांना जाहीर झाला आहे.

राज्य शासनाने या पुरस्कारांची नुकतीच घोषणा केलीय. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

राज्य शासनाने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देण्यासाठी निवड समिती गठीत केली होती. या निवड समितीने सन २०२३ यावर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना देण्याचा निर्णय घेतला. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने (दि. १५ जानेवारी) याबाबतचा शासन आदेश जारी केला.

Leave a Comment